Uncategorized

दामिनी पथकाद्वारे वैनगंगा कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन*

youtube

*दामिनी पथकाद्वारे वैनगंगा कनिष्ठ महाविद्यालयात मार्गदर्शन*
पवनी: स्थानिक वैनगंगा कनिष्ठ महाविद्यालयात भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन व भरोसा सेलच्या सहाय्यक उपनिरीक्षक श्रीमती शिंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचे कायदे व मोबाईलचे दुष्परिणाम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन दिनांक २५जूनला करण्यात आले .
सर्वप्रथम विद्येची देवता माॅ सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैनगंगा विद्यालयाचे प्राचार्य पराग टेंभेकर यांनी केले. पोलीस हवालदार दर्शना टेंभुर्णे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधित महिलांचे कायदे ,मोबाईल गुड टच व बॅड टच कसा आहे हे उदाहरणाद्वारे पटवून दिले. भंडारा पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र दुर्गे ,महिला पोलीस शिपाई श्रीमती घुगल, पोलीस शिपाई श्री मदारकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक विशाल इंगोले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक वीरेंद्र ठोंगसे यांनी केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते

Related Articles

One Comment

  1. Interesting analysis! Seeing platforms like jljl13 embrace local payment options (GCash, PayMaya) is smart for the Filipino market. Makes access so much easier! Looking for a great experience? Check out jljl13 slot download for legit fun!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close