ईतर

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी प्रियदर्शनी गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम

डॉक्टरांनी दिला ‘मुलींना जन्म द्या, त्यांचे संगोपन करा’ असा संदेश

youtube

 

पवनी : आजच्या समानतेच्या युगात स्त्री-पुरुष समान असून, महिलांनी क्रीडा, शिक्षण, व्यवसाय, राजकारण तसेच विज्ञान-तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळे स्त्रीभ्रूणहत्या रोखून मुलींच्या जन्माचे स्वागत करावे, असे आवाहन प्रियदर्शनी गणेश मंडळाच्या वतीने आयोजित मार्गदर्शन शिबिरात करण्यात आले.

गणेश वार्ड, पवनी येथील प्रियदर्शनी गणेश मंडळाच्या वतीने मंगळवार, २२ सप्टेंबर २०२६ रोजी स्त्रीभ्रूणहत्या या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष कमलाकर रायपुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात स्त्रीभ्रूणहत्या, महिलांचे आरोग्य आणि समाजातील स्त्रीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंशुल गमने, ग्रामीण रुग्णालय पवनीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वीणा वंजारी, डॉ. नम्रता तिमांडे तसेच क्षय विभागाचे जिल्हा समन्वयक डॉ. शाहिद अली यांनी मार्गदर्शन केले.

“जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाला उद्धारी” या उक्तीचा दाखला देत मुलींच्या जन्माकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन करण्यात आले. मुलगा-मुलगी भेदभाव न करता मुलींना शिक्षण, आरोग्य आणि समान संधी देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचेही मार्गदर्शकांनी सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन मंडळाचे कोषाध्यक्ष भूपेश रायपुरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश रायपुरकर यांनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सचिव प्रशांत भोगे, सहसचिव प्रवीण रायपुरकर यांच्यासह हिमांशू, आकाश, अक्षय, ओम, उमाकांत, तुषार, संदेश, अंकित, तेजस, आदेश, आशुतोष, अमोल बेले आदी मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य  केले.

ad3
ad2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close