ईतर

अडीअडचणींवर मात करून तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा यशस्वी करा

जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकूरवाडे यांचे क्रीडा शिक्षकांना आवाहन

youtube
  • पवनी : गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, कोंढा येथे पवनी तालुक्यातील क्रीडा शिक्षकांची महत्त्वपूर्ण सभा नुकतीच संपन्न झाली. तालुकास्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन यशस्वी करण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणींवर मात करून सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ललिता लेकूरवाडे यांनी केले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकूरवाडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी संजयकुमार वासनिक, तालुका क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी, गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप पवार, महाराष्ट्र आष्टेडू आखाड्याचे अध्यक्ष राजेश तलमले, क्रीडा कर्मचारी पराग गावंडे, प्रतीक लाडे व आकाश गायकवाड उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका क्रीडा संयोजक दिलीप पवार यांनी केले. संचालन निशात नेवारे यांनी, तर आभार प्रदर्शन सुनील डोनेकर यांनी केले.
ad3
ad2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close