Uncategorizedईतर
पवनी बसस्थानकाचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

- पवनी बसस्थानकाचा ७७ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा!
पवनी:-दि.१/.
पवनी बसस्थानकाने आज आपला ७७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला. या प्रसंगी बसस्थानकाची रांगोळी व सडा घालून झेंडुची फुले व आंब्यांचे पानांचे तोरण बांधून, केळीच्या खांबाने स्वागत कमानी उभारून सजावट करण्यात आली.सर्व प्रवासी व कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून वर्धापण दिनाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
गेली ७७ वर्षे पवनी आणि परिसरातील प्रवाशांच्या सेवेत असलेले हे पवनी बसस्थानक आजही या भागातील वाहतुकीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते.पवनी आगारात एकुण ३५ वाहने,प्रशासकीय कर्मचारी १७,यांत्रिक कर्मचारी २९,वाहक ३२,चालक ७३ कार्यरत आहेत.वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पत्रकार हरिश्चंद्र भाजीपाले, विभागीय कामगार अधिकारी पराग शेंभरकर,पत्रकार प्रदीप घाडगे,अशोक गिरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक किरण चोपकर,बसस्थानक प्रमुख अल्केश पशिने, यांत्रिक कर्मचारी कैलास शेंडे,लिपीक प्रिती चकोले, माधुरी ढवळे,शिल्पा इखार,गिरीश बांते,वाहतूक नियंत्रक यांत्रिक प्रशासकीय चालक-वाहक व प्रवासी उपस्थित होते.प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी भविष्यातही प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
