सामाजिक कार्याबद्दल हुकरे दांपत्यांचा सत्कार
पवनीच्या सुपुत्रांच्या सामाजिक कार्याची दखल मुंबईत

सामाजिक कार्याबद्दल हुकरे दांपत्यांचा सत्कार
नवी मुंबई, ता. 15 ऑगस्ट (ता.प्र.) —पवनीच्या भूमिपुत्राचे
सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, घनसोली (नवी मुंबई) तर्फे देण्यात येणारा “यशवंतराव चव्हाण पुरस्कार 2025” यंदा महेश हुकरे आणि त्यांची सहपत्नी नीतू महेश हुकरे यांना प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या भव्य सोहळ्यात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र रिसर्च सेंटरचे संपादक व राजकीय विश्लेषक महेश म्हात्रे होते. तसेच ज्येष्ठ समाजसेवक विजय चोरमोरे, विधान परिषदेचे आमदार विक्रम पाटील व भारत सरकारचे स्वतंत्र राज्यमंत्री दर्जाचे भरतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गौरव प्रदान करण्यात आला.
पुरस्कार सोहळ्याला अनेक मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजहितासाठी सातत्याने कार्य करीत असलेल्या हुकरे दांपत्यांचा सत्कार होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त स्वागत केले.





