शैक्षणिक
वैनगंगा विद्यालयात स्काऊट-गाईड कार्यशाळा संपन्न

वैनगंगा विद्यालयात स्काऊट-गाईड कार्यशाळा संपन्न
पवनी (प्रतिनिधी) : वैनगंगा विद्यालय पवनी येथे दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी स्काऊट-गाईड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत मार्गदर्शक स्काऊट मास्टर मनोज गजभिये व गाईड पी.एल.टी. संगिता गजभिये यांनी विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईड चळवळीची माहिती देत आनंददायी कृतीयुक्त गीते सादर करून मार्गदर्शन केले.
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय ठवरे, पर्यवेक्षक विकास रिनके, स्काऊट कॅप्टन प्रदीप घाडगे, गाईड कॅप्टन सीमा गंडाटे, गाईड शिक्षिका उर्मिला वाघमारे व स्काऊट मास्टर कुणाल बोरकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन उर्मिला वाघमारे यांनी केले तर आभार प्रदर्शन सीमा गंडाटे यांनी केले. स्काऊट व गाईड विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यशाळेचा लाभ घेतला.
—
