
वैनगंगा विद्यालयात प्रवेशोत्सव
पवनी(भंडारा): स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ विद्यालयात वर्ग पाच ते आठ या इयत्तांमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून दिनांक 23 जूनला साजरा करण्यात आला
सर्वप्रथम विद्येची देवता माॅ सरस्वतीच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हार व दीप प्रज्वलन करण्यात आले. वैनगंगा शिक्षण संस्थेच्या संचालिका भावना तर्वेकर ,प्राचार्य पराग टेंभेकर, उपमुख्याध्यापक अजय ठवरे पर्यवेक्षक प्रमोद मेश्राम, ज्येष्ठ शिक्षक विकास रीनके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप मुरकुटे, पालक रामकृष्ण मांडवकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व नवीन पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नवीन प्रवेशोत्सवाच्या व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन वैशाली कांबळे तर आभार प्रदर्शन सीमा गंडाते यांनी केले. शालेय पोषण आहारामध्ये गोड जेवण म्हणून जिलेबी देण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थितहोते
