अभिषेक नामदास यांना तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार

अभिषेक नामदास यांना तंत्रज्ञानाच्या उत्कृष्ट वापरासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता पुरस्कार
भंडारा दिनांक 27
राजीव गांधी प्रशासकिय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा 2023-24 अंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धेत सर्वोत्कृष्ट उपक्रम या श्रेणीत भंडारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे चॅटबोट यांस प्रथम क्रमांकाचे परितोषीक जाहिर करण्यात आले असुन यात रोख पारितोषीक रु.50,000/- इतके जाहिर झालेले आहे.
उपलब्ध तंत्रज्ञानाचा उपयोग करून एका Click वर जिल्ह्यातील नागरिक/आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांचेकडे योग्य व अद्यावत माहिती वेळोवेळी उपलब्ध करुन देण्याकरीता DDMA, BHANDARA ही Chatbot प्रणाली तयार करण्यात आलेली आहे. जिल्हा नियंत्रण कक्षाकडे वेळोवेळी वरिष्ठ कार्यालय व क्षेत्रीय कार्यालयाकडून संकलीत होणारी माहिती व अद्यावत तंत्रज्ञान यांचा वापर करुन “DDMA, Bhandara” हे व्हाटसएप अॅप्लिकेशन (Chatbot) तयार करुन सदर संकल्पनेस मूर्त रुप दिले गेले आहे. तत्कालिन मा.जिल्हाधिकारी श्री संदीप कदम व श्री योगेश कुंभेजकर यांच्या नेतृत्वात श्री अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी सदरची चॅटबोट प्रणाली विकसीत केली आहे.
सदर प्रणाली मार्फत जिल्ह्यातील आपत्तीविषयक घडामोडी, अद्ययावत व खात्रीशीर माहिती, प्रशासकीय सूचना नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर “DDMA Bhandara” या Chatbot च्या माध्यमातून एका click वर उपलब्ध होणार आहे. सदर चॅटबोटवरील भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेला इशारा व संदेश, जिल्ह्यातील धरण/प्रकल्पांची धोका, इशारा व सद्याची पाणी पातळी, जिल्ह्यातील रस्ते वाहतूक सद्यस्थिती इ. विषयक माहितीचा वापर करुन नागरिकांना आपत्तीची पूर्वकल्पना मिळत असून प्रशासनावरील ताण कमी झालेला आहे. नागरीकांना सुरक्षीत स्थळी स्थलांतरण करण्यास मदत होत आहे. परिणामी आपत्तीमध्ये होणारी संभाव्य जिवित व वित्तहानी टाळणे शक्य झाले आहे. सदर चॅटबोट प्रणालीचा नागरीकांनी वापर करण्याबाबत मा.डॉ.संजय कोलते, जिल्हाधिकारी भंडारा व श्रीमती स्मिता बेलपत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आवाहन केले आहे.
या प्रणालीचा वापर करण्याकरीता नागरीकांनी 9767968166 या क्रमांकावर व्हाट्स एपव्दारे Hi किंवा नमस्कार असा मॅसेज पाठविल्यावर आवश्यक माहिती प्राप्त करुन घेता येते.





