भंडारा येथे ‘नशिब लिहिण्याची लेखणी तुमच्या हातात’ या विषयावर बी.के. शिवानी दीदी चे व्याख्यान

५ फेब्रुवारीला भंडारा येथे ‘नशिब लिहिण्याची लेखणी तुमच्या हातात’ या विषयावर बी.के. शिवानी दीदी चे व्याख्यान
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते बी. के. शिवानी दीदी यांना जागतिक शांतता आणि मानव कल्याणासाठी सतत झटणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या महिला संस्थेच्या वतीने नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. बी.के शिवानी दीदींची प्रेरणादायी शिकवण ‘नियतीची लेखणी तुमच्या हातात आहे. या विषयावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम बुधवार ५ फेब्रुवारी २०२५ ला सायं. ५ ते ८ या वेळी खात रोड येथील रेल्वे मैदान भंडारा येथे होणार आहे. शिवानी दीदींच्या कार्यक्रमानंतर ६, ७ व ८ फेब्रुवारी २०२५ ला सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत तीन दिवसीय तणावमुक्त आणि ध्यान अनुभव शिबिराचेही आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
शिबिराचे मार्गदर्शक म्हणून मुंबईचे डायनॅमिक ट्रेनर आणि समुपदेशक प्रोफेसर बी.के .ई.व्ही. गिरीश संबोधित करणार आहेत. भंडारा येथील स्थानिक सेवा केंद्र ब्रह्माकुमारी राजयोग अनुभूती केंद्र, खोकरला, कृष्ण मंदिर वॉर्ड येथे किंवा बीके शिवानी भंडारा येथील ओमशांतीच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही प्रवेश पास मिळवू शकता. प्रवेश पास विनामूल्य आहे. परंतु नोंदणी अनिवार्य आहे. अशी माहिती ब्रह्माकुमारी रक्षा दीदी, राजयोगी ब्रह्माकुमार प्रेमप्रकाश भाई यांनी खोकरला सेवा केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, रेल्वे ग्राऊंडमध्ये दहा हजार लोकांची बसण्याची व्यवस्था आहे, मात्र येथे १२ हजार लोकच बसू शकतील. या वरील विषयावर व्याख्यान बी.के शिवानी दीदी मागदर्शन करतील सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. यावेळी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध व्यक्तीही उपस्थित राहणार आहेत. तीन-चार ठिकाणी तसेच कार्यक्रमस्थळा जवळ पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमात १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना घेऊन येऊ नये, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर उपस्थित राहावे. सर्वानी मोबाईल फोन सायलेंट मोडवर ठेवावेत. कार्यक्रमाच्या शेवटी पत्रपरिषदेत बी.के.च्या उपस्थित पत्रकारांचे बी.के. प्रेम प्रकाश भाई आणि रक्षा दीदी, बी के. शालू दीदी यांनी भेटवस्तू देऊन स्वागत केले.
त्यावेळी उपस्थिती पत्रकार परिषदेत उपस्थित ब्रम्हाकुमारी भंडारा केंद्र संचालिका बी के. रक्षा दीदी, बी के. शालू दीदी, प्रेमप्रकाश भाई, बी.के. गौरीशंकर भाई, विजय भाई, शालिक रामभाई, मधुकर भाई, वसंतभाई, जयदेव भाई, गुलाब भाई, नयन भाई, सत्यजित भाई उपस्थित होते.
