Uncategorized
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना डीजेचा त्रास

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना डीजेचा त्रास
पवनी: कुठलाही आनंद उत्सव असो की लग्न यामध्ये डीजेचा आनंद घेण्याचा मोह आवरत नाही परंतु मार्च महिना म्हटला की विद्यार्थ्यांचा परीक्षेचा कालावधी असतो या कालावधीमध्ये रात्रीच्या दहापर्यंत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आवाज ठेवून डीजे वाजवल्यास कुणालाही त्रास होणार नाही. सध्या दहावी आणि बारावीची परीक्षा सुरू विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला अडथळा निर्माण होत आहे. उशिरा रात्रीपर्यंत डीजे वाजवणाऱ्या घरमालक किंवा विवाह कार्यालये यांना वेळीच प्रतिबंध लावावा व कठोर कारवाई करावी अशी जनतेची मागणी आहे.
विवाहकार्यालय किंवा सभागृहांमध्ये रात्रीच्या दहा वाजेपर्यंतच डीजे वाजवण्याची परवानगी असतानाच या मंगल कार्यालयांनी कायद्याचे उल्लंघन करण्याच्या विडा उचललाय.





