Uncategorized

तान्हा पोळ्यात चिमुकल्यांचा जल्लोष; नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

youtube

तान्हा पोळ्यात चिमुकल्यांचा जल्लोष; नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग

पवनी : पवनी येथील सोमवारी वार्डातील सक्सेना प्राथमिक शाळेच्या पटांगणात तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांनी आकर्षक पद्धतीने सजविलेल्या नंदींसह सहभाग घेत पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष . विजया नंदुरकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून राकेश बिसने, मोरेश्वर भोगे, सुधीर भोगे, आशिष फुलबांधे, दिलीप भोगे, श्रावण भोगे, नत्थुजी रायपुरकर व रवि भिसेकर उपस्थित होते.

नंदी सजावट स्पर्धेत मोक्षीत कोरे प्रथम, नित्या कडुकर द्वितीय तर अर्णव भोगे तृतीय ठरले. वेशभूषा स्पर्धेत मानस बिसने प्रथम, नित्या रायपुरकर द्वितीय तर मिस्कान कोल्हे हिने तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेचे परीक्षण श्री गिरी , हरडे , शशिकांत भोगे, राजेंद्र गिन्हेपूंजे सर व दुर्गदेव तिमांडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य प्रणय धुरई, प्रतिक भोगे, अनिकेत बिसने, अंशुल बिसने, हर्षल बिसने व आकाश रायपुरकर यांनी परिश्रम घेतले.

  1. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन राकेश बिसने यांनी केले. चिमुकल्यांच्या उत्साहामुळे तान्हा पोळ्याला उत्सवी आणि आनंदमय वातावरण निर्माण झाले.•
ad3
ad2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close