पवनी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवनी शहरात माँ भंगाराम देवी मंदिर, नागपूर रोड येथे शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता ‘तान्हा पोळा’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नंदीबैल सजावट व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, पारंपरिक संस्कृती व ग्रामीण परंपरेचे जतन करणाऱ्या या उपक्रमात बालगोपालांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. तान्हा पोळा उत्सवाच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सजविलेल्या नंदीबैलांसह बालकांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
माँ भंगाराम देवी पंचकमीटी व नवरात्र उत्सव समिती, पवनी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
“परंपरा जपूया, संस्कृती पुढे नेऊया!” 🐂🌺







